Home संगमनेर संगमनेर: पोहतांना वीजेच्या शॉक लागून चार भावांचा दुर्दैवी मृत्यू

संगमनेर: पोहतांना वीजेच्या शॉक लागून चार भावांचा दुर्दैवी मृत्यू

Sangamner: चार चिमुकल्यां भावडांचा वीजेचा शॉक (Electric Shock) लागून त्यांचा दुर्देवी मृत्यू.

death of four brothers due to electric shock while swimming

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खंदरमाळवाडी परीसरातील वांजरकडा या छोट्याशा तलावात आंघोळीसाठी व खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या चार चिमुकल्यां भावडांचा वीजेचा शॉक लागून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज शनिवारी दुपारी घडली.

या घटनेने पठार भागासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत अनिकेत अरूण बर्डे (वय 12), ओंकार अरूण बर्डे (वय 10), दर्शन अजित बर्डे (वय 8), विराज अजित बर्डे (वय 6), या चौघा भावडांचा यात समावेश आहे.

याबाबत समजेलेली माहिती अशी की, आज शनिवारी दुपारी वरील चारही भावंडे आंघोळीसाठी तसेच खेकडे पकडण्यासाठी खंदरळमाळवाडी परिसरातील वांजरकडा येथे असणाऱ्या छोट्या तलावात गेले होते. दरम्यान दोन दिवसांपुर्वी झालेल्या वादळामुळे तलावा शेजारून जाणाऱ्या उच्च दाबाच्या प्रवाहाची तार तुटून त्याचा वीज प्रवाह या तलावात उतरला होता. याची कल्पना त्यांना न आल्याने ते आंघोळीसाठी तलावात उतरले. आणि त्यांना वीजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे एकमेकांना वाचविण्यात चौघांचाही जीव गेला. याबाबतची माहिती आजूबाजुच्या नागरीकांना समजली असता घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कसबे यांच्यासह नागरीकांनी घटनास्थळी येऊन चारही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. याबाबतची माहिती घारगाव पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्यासह सहाय्यक फौजदार राजू खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.

सदर ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्थीत रस्ता नसल्याने या चौघांचेही मृतदेह झोळी करून गावात आणण्यात आले व तेथून रूग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर कॉटेज रूग्णालयात पाठविण्यात आले. वरील घटनेत अनिकेत आणि ओंकार हे दोघे सख्खे भाऊ तर दर्शन आणि विराज हे दोघे सख्खे भाऊ आशा दोन कुटूंबातील चार भावडांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तसेच महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही दुर्देवी घटना घडल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे.

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ परिसरात वांदरकडा तलावात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांचा विजवाहक तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. या घटनेने बर्डे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून या कठिण प्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. – माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Web Title: death of four brothers due to electric shock while swimming

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here