Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात या तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता, अलर्ट जारी

अहमदनगर जिल्ह्यात या तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Ahmednagar rain Alert:  वादळी वारा, मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.

Ahmednagar rain Alert two day

अहमदनगर: जिल्ह्यात वादळी वारा, मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.  

प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल यांनी स्पष्ट केले की, नगर जिल्ह्यात आतापर्यंत 562.9 मि.मी. पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी ही 125.6 टक्के आहे. दुसरीकडे नगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातील विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान सुरु असून अतिवृष्टी झाल्यास धरणाव्दारे सोडण्यात येणार्‍या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यामुळे नदी काठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते कि स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

सखल भागात राहणार्‍या नागरीकांनी तातडीने सुरक्षीत स्थळी स्थल्नांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरी पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Ahmednagar rain Alert two day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here