संगमनेर शहर व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक भयभीत- Theft
Sangamner Theft: स्विफ्ट डिझायर कार एमएच १२ केवाय ८४९ ही कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
संगमनेर: संगमनेर शहर व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दिवसा ढवळ्या घरफोडयासह दुचाकी, चारचाकी वाहने चोरली जात आहे. तर रात्रीच्या वेळी गाड्यामधून पेट्रोल चोराची नवी टोळी शहरात सक्रीय झाली आहे. दरम्यान काल शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गुंजाळवाडी शिवारात घरफोडी करून पाच हजारांची रोकड लंपास केली तर गणेश नगर येथून चक्क मारूती स्वीफ्ट डिझायर कार चोरून नेली. या घटनेने नागरिक भयभीत असून चोरट्यांचा बंदोबस्त करणे पोलीसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशिल साहेबराव गागरे यांच्या स्वदेश हॉटेल मागे गुंजाळवाडी येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली. तर त्यांच्या शेजारी रहाणारे पंकज साहेबराव कदम यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील कपाटातील पाच हजार रूपये रोख रक्कम चोरून नेली. तर तीसऱ्या घटनेत गणेश तैराम आंबरे (रा. वृंदावन सोसायटी गणेश नगर) यांची घराबाहेर लावलेली दिड लाख रूपये किंमतीची पांढऱ्या रंगाच मारूती कंपनीची स्वीफ्त डिझायर एमएच १२ केवाय ८४९ ही कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरात दुचाकींच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे त्या पाठोपाठ पेट्रोल चोरी घरफोड्या यामुळे नागरीक भयभीत आहे.
Web Title: Citizens are scared due to increase in number of thieves in Sangamner city