नाशिक हादरलं! डॉक्टरने अल्पवयीन नर्सवर केला शारीरिक अत्याचार, हात पाय दुखत असल्याचा बहाणा करीत
Nashik Rape Case डॉक्टरने अल्पवयीन नर्सवर केला शारीरिक अत्याचार, हात पाय दुखत असल्याचा बहाणा करीत शारीरिक अत्याचार.
नाशिक: राज्यात बलात्कार व अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आता नाशिकमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने परिचारिकेवर हात पायाला स्पर्श करीत शारीरिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. उल्हास कुटे असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे एका खासगी रुग्णालयात ही धक्कादायक व संतापजनक घटना घडली. पीडित तरुणी या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे. संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याने पीडितेच्या रूममध्ये प्रवेश केला. तसेच माझे हात पाय दुखत असल्याने मी येतोय असे सांगत रूममध्ये प्रवेश केला. यानंतर पीडितेच्या शरीराला स्पर्श करत तिच्यावर बळजबरी करत शारीरिक अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेने केली आहे.
इतकेच नव्हे तर अत्याचार केल्यानंतर संशयित आरोपी कुटे याने पीडित तरुणीला धमकी दिली. ही बाब जर कुणाला सांगितली तर तुला कामावरून काढून टाकील, अशी धमकी दिली. घडलेल्या या प्रकारानंतर तरुणीने नातेवाईकांच्या मदतीने पोलिसात धाव घेतली. यानंतर अंबड पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची दखल घेत पीडितेचे तक्रारीनुसार बलात्कार, पीडित अल्पवयीन आणि अनुसूचित प्रवर्गातील असल्याने पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Rape Case doctor physically assaulted a minor nurse