Accident: एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक
Accident: एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात.
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. यामध्ये काही शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. चिपळूण धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस या दोन बसमध्ये अपघात झाला आहे.
रस्त्यावर अवघड वळण असल्यामुळे चालकांना अंदाज न आल्याने हा अपघात (Accident) झाला असल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. या अपघातातील जखमींना RGPPL च्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. त्यामुळे गुहागर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Web Title: Two buses of ST corporation collided head-on in a terrible accident