Home औरंगाबाद शिंदे गटात गेलेल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

शिंदे गटात गेलेल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

Rape Case: पीडितेचे दीड ते दोन कोटी हडपले, गर्भपात, फसवणुकीचा आरोप.

Rape case against Yuva Sena office bearer who joined Shinde group

औरंगाबाद : शिंदे गटात प्रवेश केलेला युवासेनेचा तत्कालीन पूर्व शहर अधिकारी ज्योतीराम विठ्ठलराव धोंगडे (रा. मातोश्रीनगर, गारखेडा) यांच्यावर बलात्कारासह गर्भपात, जिवे मारण्याचा प्रयत्न, बंदुकीचा धाक दाखवून दीड ते दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी ज्योतीराम धोंगडे हा महापालिकेच्या टँकरने पीडितेच्या घरी पाणीपुरवठा करीत होता. त्यातून दोघांची ओळख झाली. त्याच कालावधीत पीडितेचे पतीसोबत वाद सुरू झाले. त्याचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेला धीर देत स्वतःच्या जाळ्यात ओढले. एप्रिल २०१९मध्ये दौलताबाद परिसरातील हिरण्य रिसॉर्ट येथे फिरायला नेले. तेथे शारीरिक संबंध निर्माण झाले. त्यावेळी आरोपीने आक्षेपार्ह चित्रफीत काढली. त्यानंतर ती चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेकडून सुरुवातीला तीन लाख रोख, एक मोबाइलसह ३५ लाख रुपयांचे दागिने घेतले. त्यानंतर त्याने राहत्या घरासह शहरातील नामांकित हॉटेलमध्ये, तसेच मुंबई, पुण्याला नेत अत्याचार केले.

आरोपीसोबतच्या संबंधातून पीडिता गरोदर राहिली. त्यातून २३ डिसेंबर २०१९ रोजी एक मुलगी झाली पीडितेच्या पतीला आरोपीसोबतच्या संबंधांची माहिती झाल्यावर पतीने तिला घटस्फोट दिला. पहिली मुलगी पीडिता आरोपीपासून दोन वेळा गरोदर राहिली. तेव्हा आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात केला. २ मार्च २०२२ रोजी पीडिता तीन महिन्यांची गरोदर असताना आरोपीने तिच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे गर्भाचा पोटातच मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बंदुकीचा दाखवला धाक

आरोपी ज्योतीरामने कॅनॉटमध्ये शनिवारी रात्री बोलावून घेत पीडि मुलीला बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच राजकारणामध्ये असल्यामुळे तुझ्यासोबत लग्न करू शकणार नसल्याचेही स्पष्ट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ज्योतीराम धोंगडे याच्या विरोधात दाखल गुन्हा हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे. त्याच्याकडे सध्या शिंदे गटातील कोणतेही राजकीय पद नाही.

-राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख (शिंदे गट)

आरोपी ज्योतीराम याचा युवसेनेसोबत कोणताही संबंध नाही. तो राजेंद्र जंजाळ यांचा कट्टर कार्यकर्ता असल्यामुळे त्यांच्यासोबतच त्याला युवासेनेतून काढून टाकण्यात आले आहे.

– ऋषिकेश खैरे, उपसचिव, युवासेना (ठाकरे गट)

Web Title: Rape case against Yuva Sena office bearer who joined Shinde group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here