अहमदनगर: विद्यार्थ्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने धडक दिल्याने अपघात
Ahmednagar Accident: विद्यालयाच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने धडक दिल्याने मुलगा गंभीर जखमी.
नेवासा: नेवासा तालुक्यातील जवाहर माध्यमिक विद्यालयाच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने धडक दिल्याने मुलगा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी डंपर चालक न थांबता पसार झाला आहे. यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. जखमी विद्यार्थ्याला नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.
शनिवारी आठवडे बाजार असल्याने सकाळपासूनच चांदा कुकाणा रस्त्यावर वर्दळ सुरू होती. त्यातच जवाहर विद्यालयाची चाचणी परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी सकाळीच शाळेला येत असताना इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सोमनाथ कानिफ दहातोंडे हा आपल्या सायकलवरून शाळेत येत असताना शाळेजवळीलच नदीजवळ घोडेगाव मार्गे येणाऱ्या मालवाहू ढंपरणे त्यास धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन बाजूला फेकला गेला.
सात सव्वासाची वेळ असल्याने शालेय विद्यार्थी वगळता वर्दळ तशी कमी होती. आठवडे बाजारच्या दिवशी सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरत असल्याने प्राथमिक शाळांचे शिक्षकही सुदैवाने आपल्या शाळेकडे याचवेळी जात होते. त्याच ठिकाणी प्राथमिक शिक्षक किरण दहातोंडे व राहूल जाधव, प्राथमिक शाळेत जाण्यासाठी आपल्या गाडीतून निघाले असतानाच त्यांच्यासमोर हा प्रकार घडला. क्षणाचा ही विलंब न करता प्राथमिक शिक्षक किरण दहातोंडे व जाधव व गावातील प्रशांत बोरुडे आण्णा दहातोंडे यांनी सदर मुलाला उचलून घेत आपल्या गाडीत घेऊन गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर डॉक्टर निकाळजे यांनी परिस्थिती पाहता सदर जखमी मुलाला पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे .
Web Title: student was hit by a speeding dumper in an accident