धक्कादायक! नराधम बापाचे कृत्य: मोबाईलवर अश्लील फोटो दाखवून अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ
Crime: मुलीला मोबाईलमधील अश्लील दाखवून तिचा लैंगिक छळ (Sexual harassment).
वर्धा: येथे नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नराधम बापानेच अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित मुलगी आंघोळ करायला गेल्यावर नराधम बाप तिच्याकडे वाईट नजरेतून पाहायचा. मुलीला मोबाईलमधील अश्लील दाखवून तिचा लैंगिक छळ करायचा. पीडित मुलीने वडिलांना असे कृत्य करण्यास रोखले असता तिला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोस्को कायद्यांतर्गत रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,, वडिलांच्या लैंगिक छळाला कंटाळून पीडित मुलगी काकाकडे राहायला गेली होती. पीडितीचे आई २०१९ मध्ये पतीच्या त्रासाला वैतागून माहेरी निघून गेली होती. तेव्हापासून पीडिता आजी,आजोबा आणि वडिलांसोबत राहत होती. मागील तीन महिन्यांपासून नराधम बाप पीडितेशी अश्लिल चाळे करीत होता. याची माहिती पिडीत मुलीने तिच्या आजीला दिली होती.
आजीने नराधम बापाच्या घृणास्पद कृत्याला विरोधही केला होता. तरीही बापाने मुलीचा लैंगिक छळ (Sexual harassment) सुरूच ठेवला. त्यानंतर पीडित मुलीने तिच्या आजीसोबत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
Web Title: Sexual harassment of minor girl by showing obscene photos