अकोले: राजूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पाठविले तडीपारीचे प्रस्ताव
अकोले: अकोले तालुक्यातील आदिवासी भागाचे मुख्य केंद्र समजल्या जाणाऱ्या राजूर गावातील अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राजूर पोलिसांनी एक धाडसी पाउल उचलेले असून अवैध दारू विक्री करणारी टोळी व तीन जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक व संगमनेरचे उप विभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल केले असून यावर येत्या आठ दिवसांत निर्णय होणार आहे.
याबबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, राजूर गावामध्ये दारूबंदी असून अवैध दारू मोठ्या प्रमाणावर विकली जाते. राजूर पोलीस व उत्पादन शुल्क विभाग हे वारंवार छापे तसेच कारवाया करत असतात. परंतु त्यांच्या असे लक्षात आले कि, एक टोळीच यात आहे. तसेच काही लोक हे काम करतात त्यामुळे शांतता भंग होते.त्यामुळे राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी यांनी टोळी प्रमुख संजय अदालतनाथ शुक्ला यांच्यासह राहुल अदालतनाथ शुक्ला, विनय अदालतनाथ शुक्ला यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा ५५ प्रमाणे तडीपारीचे प्रस्ताव व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल केला असून त्यांना नोटिसाही आल्या आहेत. संजय शुक्ला विरुद्ध सन २०१५ पासून ७ वेगवेगळे गुन्हे दाखल असून यामध्ये अवैध दारू विक्रीच्या ५ केसेस दाखल केलेल्या आहेत.
Website Title: Rajur proposels sent to illegal liquor vendors