Raid: संगमनेरात छापाः ४०० किलो गोवंश मांस जप्त
Sangamner Crime Raid: एक पिकअप जीप असा ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संगमनेर: संगमनेरात कत्तलखाने सुरूच असल्याचे स्पष्ट झाले. शहरातील रहेमत नगर मधील मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे संगमनेर शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा घालून ४०० किलो गोवंश मास व वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी एक पिकअप जीप असा ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर सदरचे वाहन बदलण्यात आल्याचे वृत्त आहे. संगमनेर शहरात सुरू असलेले गोवंश कत्तलखाने बंद नसल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.
याबाबत सलमान बाबाजी सय्यद (वय २७ वर्षे रा. आंबी खालसा, तालुका संगमनेर, हल्ली मुक्काम रहेमत नगर संगमनेर) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस शिपाई कानिफनाथ दत्तात्रय जाधव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या परिसरात छापा टाकला असता गोवंश कत्तल केलेले मांस पिकअप जीप मध्ये भरून ठेवण्यात आलेले होते. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Raid in Sangamnerat 400 kg beef seized