अहमदनगर: तरुणीच्या राहत्या घरात घुसून अत्याचार – Rape Case
Shrirampur Rape Case: तरुणीच्या राहत्या घरात घुसून मारहाण, दमदाटी करीत बळजबरीने अत्याचार.
श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील हरेगाव फाटा परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणीच्या राहत्या घरात घुसून मारहाण, दमदाटी करीत बळजबरीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तसेच तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापूर तालुक्यातील कापूरवडगाव येथील आरोपी तरुणास अटक करण्यात आली आहे. काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरात राहणार्या एका 28 वर्षीय तरुणीच्या घरात वैजापूर तालुक्यातील कापूरवडगाव येथील कृष्णा सुभाष घोगटे हा तरुण बळजबरीने घुसून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पिडीत तरुणीने आरोपी कृष्णा घोगटे याच्या पत्नीशी संपर्क केला असता त्याचा राग आल्याने कृष्णा घोगटे याने या पिडीत तरुणीला मारहाण करुन शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपी कृष्णा घोगटे याचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय असून तो विवाहित आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पिडीत तरुणीने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी कृष्णा सुभाष घोगटे याचेविरुध्द भादंवि कलम 376, 452, 342, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरुवडे हे करत आहेत.
Web Title: Rape Case abused breaking into the residence of a young woman