Home जळगाव Accident: ट्रक अंगावरून गेल्याने महिला ठार

Accident: ट्रक अंगावरून गेल्याने महिला ठार

Accident:  दुचाकीला मागून धडक दिल्याने वाहनावरून पडलेल्या महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्याने तिचा जागीच मृत्यू.

Accident woman was killed when the truck ran over her

जळगाव: काकूला बघायला जात असलेल्या दांपत्याच्या दुचाकीला मागून धडक दिल्याने वाहनावरून पडलेल्या महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावर मन्यारखेडा फाट्यासमोर रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. मृत ३७ वर्षीय महिला ही एलआयसीच्या औरंगाबाद शाखेतील कर्मचारी आहे.

शिवाजीनगरातील रहिवासीशेषराव दीपके (४०) हे पत्नी शीतलसोबत रविवारी दुपारी भुसावळ येथे काकूला बघण्यासाठी दुचाकीने जात होते. मन्यार फाट्यावरून जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकी उसळली. त्यानंतर लगेचच पुन्हा दुसरी धडक दिली. त्यात मागील सीटवर बसलेल्या शीतल या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने शरीराचा चेंदामेंदा झाला. शेषराव दीपके जखमी झाले.

Web Title: Accident woman was killed when the truck ran over her

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here