संगमनेरमध्ये तीन अपघातांत महिलेसह चार जण ठार
Sangamner Accident News: संगमनेर तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चौघे ठार झाले.
संगमनेर: संगमनेर तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात संदीप खंडू माने (वय ३८), भरत बाबुराव कराळे (वय ५६, तांभोळ, ता. अकोले), रुपाली बाळासाहेब कुडेकर (वय २९, पुणे) व सचिन बाळू गायकवाड (वय २२, तामसवाडी, निफाड) हे चौघे ठार झाले.
पिकअप (एम. एच. १५ एफ. व्ही. ९४३४) भरधाव वेगाने चालली असता अकोलेकडे जाणारी दुचाकी (एमएच १७ बीएच २२४०) हिला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात संदीप माने व भरत कराळे जागीच ठार झाले. हि घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजता संगमनेर-अकोले रोडवरील डेरेवाडी फाटा येथे घडली.
दुसरा अपघात बुधवारी ८.३० वाजता नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाट्याजवळ झाला. दुचाकी (एम. एच. ०३ एक्स ५३३४) हिला ट्रकने धडक दिल्याने बसमधून उतरून वडिलांसोबत घरी चाललेली रुपाली कुडेकर खाली पडली. तिच्या डोक्याला मार लागल्याने ती जागीच ठार झाली. रुपाली रक्षाबंधनासाठी माहेरी आली होती. रुपाली मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रकची सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शहर पोलिस तपास करत आहेत.
तर तिसरा अपघातात शुक्रवारी सकाळी ८ वाजता संगमनेर-लोणी रस्त्यावरील मांची फाटा येथे झाला. सचिन गायकवाड हा चिंचपुरकडे दुचाकी (एमएच १५ डिझेड ४७४३) वरून जात असताना मध्यप्रदेश परिवहन मंडळाची पुणे – उज्जैन बस (एमपी १३ एबी ३३३३) हिने दिलेल्या धडकेत तो जागीच ठार झाला. अपघात होताच चालक व वाहक पळून गेले. देवराम बाबुराव माने ( तांभोळ, ता. अकोले) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी पिकअप चालक कैलास नामदेव सदगीर ( मुथाळणे, ता. अकोले) याच्यावर गुन्हा दाखल केला.
Web Title: Four persons, including a woman, were killed in three accidents in Sangamner