प्रेमसंबधातून एकाची भररस्त्यात धारदार शस्त्राने भोसकून हत्या
Nagpur Murder Case: घर बदलले. याच रागातून आरोपीने त्यांची भर रस्त्यात भोसकून हत्या.
नागपूर: नागपूर येथे नारायण द्विवेदी हत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. याप्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मयत नारायण यांच्या अल्पवयीन मुलीचे घरमालकाच्या मुलासोबत प्रेमसंबध होते. याबाबत नारायण यांना कुणकुण लागली. त्यामुळे त्यांनी घर बदलले. याच रागातून आरोपीने त्यांची भर रस्त्यात भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी शहरातील गिट्टीखदान परिसरात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या जवळ नारायण द्विवेदी यांची भर रस्त्यात हत्या (Murder) झाली होती. नारायण यांची हत्या त्यांच्या जुन्या घर मालकाच्या २० वर्षीय मुलानेच केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बलराम पांडे या घर मालकाचा मुलाला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीवर होते प्रेम.
बलराम पांडे याचे नारायण द्विवेदी यांच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. तो सतत द्विवेदी यांच्या मुलीचे पाठलाग करायचा,छेड काढायचा. याच मुद्यावरून नारायण द्विवेदी यांनी एक दोन वेळेला बलरामला समजावले होते. त्यांनी बलरामच्या वडिलांना ही माहिती दिली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी द्विवेदी कुटुंबीयांकडून त्यांच्या अल्पवयीन मुलीची आरोपीकडून छेडखानी केली जात असल्याची कोणतीही तक्रार पोलिसांकडे केली नव्हती असा दावा केला आहे.
हत्येचा उलगडा:
रविवारी सकाळी नारायण द्विवेदी हे शहरातील गजबजलेल्या काटोल रस्त्यावर सकाळी हे दुचाकीने ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी नारायण द्विवेदी यांच्यावर अनेक वार केल्याने ते दुचाकीसह रस्त्यावरचं कोसळले,त्यात त्यांचा मृत्यू झाला. आरोपींनी नारायण गयाप्रसाद द्विवेदी यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाचा मोबाईलवर फोटो काढला होता. नारायण द्विवेदी यांची हत्या झाल्यानंतर घर मालकाच्या मुलाचे वर्तन योग्य नसल्याने घर रिकामे केले होते. त्या वादातून हत्या झाल्याचा संशय नारायण यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. आज त्यांच्या हत्येचे कारण उघडकीस आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
Web Title: Murder stabbed to death with a sharp weapon during a love affair