राजूर आठवडे बाजारावर असलेली कोंडी दूर करण्याचे काम राजुर पोलिसांनी केले
राजूर आठवडे बाजारावर असलेली कोंडी दूर करण्याचे काम राजुर पोलिसांनी केले
ललित मुतडक राजूर प्रतिनिधी – राजूर आठवडे बाजारावर कायद्याचे व दुष्काळाचे सावट.त्यामुळे आठवडे बाजाराने घेतला मोकळा श्वास व कारवाईचे व्यापारी व ग्रामस्थांकडून स्वागत.
याविषयी सविस्तर वृत्त असे की,राजूर येथील सोमवार आठवडे बाजारात निर्माण होत असलेली कोंडी दूर करण्यासाठी अस्ताव्यस्त बसणारे बाजारकरू व दुकानदारांना शिस्त लावण्याचे काम राजुर पोलिसांनी केले.त्यामुळे आठवडे बाजाराने मोकळा श्वास घेतला.राजुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
अकोले तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने उंचावलेला तालुका मानला जातो.त्यामुळे पर्यटकांची मोठी वर्दळ चालू असते,आठवडे बाजाराच्या दिवशी या आदिवासी भागातून तसेच खेड्यापाड्यांतील इतर समाजाचे लोक येथे बाजार करण्यासाठी येत असतात.राजुर ही संपूर्ण चाळीस गाव डांग भागाची मोठी बाजारपेठ मानली जाते.तर राजूर हे या डांग भागासाठी मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे.अकोले, संगमनेर,धांदरफळ,समशेरपूर,देवठा ण लिंगदेव, कोतुळ,ब्राम्हणवाडा,घोटी तसेच खेडोपाडी राहणारे छोटे-मोठे व्यावसायिक,शेतकरी आपली दुकाने रस्त्यावरच थाटतात.त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.तर पर्यटकांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पो.नि.कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी कडक व धडक कारवाई करण्यात आली.पो.हे.कॉ.प्रवीण थोरात,अशोक गाडे व महिला पो.हे.कॉ अश्विनी राऊत यांनी दुकानांची जागा हलवून तसेच रस्त्यामध्ये व्यापाऱ्यांनी टेंट बांधण्यासाठी ठोकलेले खिळे व गज त्यांच्यावर सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची कायद्याने कारवाई करून वाहतुकीस रस्ता मोकळा करून दिला.तसेच राजुर बसस्थानक परिसर व भारतीय स्टेट बँक समोरील बेकायदेशीररित्या लावलेल्या वाहनांना, प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना व वाहतुकीची कोंडी करणाऱ्यांना मज्जाव करून वाहनचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.यापुढेही बेशिस्त, कर्णकर्कश हॉर्नचा आवाज,रोडरोमिओंचा उच्छाद,अवैद्य धंदे चोरट्या मार्गाने वाळू तस्करी,दारू विक्री,गांजा विक्री,मटका जुगार, फॅन्सी नंबर प्लेट,टवाळखोर तरुणांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.राजुर पोलिसांच्या या कारवाईचे जनतेने उस्फुर्त स्वागत केले.तर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सोमवार आठवडे बाजारतील कोंडी दूर झाली.तसेच राजूर येथील सोमवार आठवडे बाजारासाठी ग्रामपंचायतने बाजारकरुंसाठी कुठल्याही प्रकारचे नुकसान न होता बाजारतळासाठी जागा ही मोठ्या व मोकळ्या जागेत बाजारासाठी व्यवस्था करून देण्याची मागणी व्यापारी वर्गातून,ग्रामस्थांकडून यावेळी करण्यात आली. त्यामुळे बाजार करून चे नुकसान देखील होणार नाही आणि वाहतूक कोंडी त्यामुळे होणार नाही.
चौकट :- राजूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी यांनी दारूची अवैध वाहतूक,अवैध व चोरट्या मार्गाने चालणाऱ्या दारू,गांजा,मटका,जुगार विशेषतः वाळू यांची गुप्तवार्ता देणाऱ्यास बक्षीस राजूर पोलीस स्टेशनकडून देण्यात येईल व गुप्तवार्ता देणाऱ्या व्यक्तीचे नाव हे गुप्त ठेवण्यात येईल.
Website Title: Rajur police did the task of Market
Latest: Sangamner News, Akole News, And Entertainment News
अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.