Home पुणे जुन्नर तालुक्यात एक जण पाण्याच्या प्रवाहात गेला वाहून अन…

जुन्नर तालुक्यात एक जण पाण्याच्या प्रवाहात गेला वाहून अन…

Junnar Taluka heavy rain:  शहरात व ग्रामीण भागात मुसळधार पाउस सुरु,  शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर.

Junnar Taluka heavy rain

नारायणगाव: राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात सर्वत्र पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात व ग्रामीण भागात मुसळधार पाउस सुरु आहे. हवामान विभागाने पुण्याला रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शाळांना देखील दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध प्रकारच्या घटना देखील घडत आहे.  

जुन्नर तालुक्यातील गोद्रे गावात एक तरुण पाण्यातून वाहत गेल्याची घटना घडली आहे.

जुन्नर तालुक्यातील पश्चिम गोंद्रे येथील ओढ्याला आलेल्या पुरा मुळे एकनाथ सोपान रेगडे (रा. गोंद्रे, ता. जुन्नर) हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहांत चाहून गेला. पुढे वाहत जाऊन काही अंतरावर तो मिळून आला आहे. या व्यक्तीच्या पायाला मार लागला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. गोद्रे येथे पुल बांधण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होता आहे. नुकताच पूल मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन ही झाले आहे. मात्र प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू झाले नसल्याने नागरिकांना धोकादायकरित्या प्रवास करावा लागत आहे. तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

Web Title: Junnar Taluka heavy rain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here