तुझ्या रूमवर चल असे म्हणून तरुणाने केला रुममध्ये लैंगिक अत्याचार
Pune Crime sexually assaulted: आरोपीने हाताची नस कापून घेतो अशी धमकी देत लैंगिक अत्याचार.
पिंपरी: लग्न ठरल्यानंतर तरुणाने त्याच्या होणाऱ्या पत्नीला रूम दाखविण्यास सांगितले. तुझ्या रूमवर घेऊन चल असे म्हणून रूमवर जाऊन तिच्यावर तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच तिला धमकी दिली. सदर घटना १७ एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास धावडे वस्ती भोसरी येथे घडली.
भैराम अच्छीलाल बेडिया (वय ३३, रा. गुळवेवस्ती, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे लग्न ठरले होते. दरम्यान फिर्यादी आणि आरोपी बाहेर फिरायला गेले. फिरून आल्यावर आरोपीने तरुणीची रूम बघायची असल्याचे सांगून तो तिच्या रूमवर गेला. तिथे तरुणींशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने नकार दिला असता आरोपीने हाताची नस कापून घेतो, अशी धमकी देऊन फिर्यादीवर लैंगिक अत्याचार (Sexual abused) केला. लग्न कर, असे फिर्यादीने म्हटले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून पाहून घेतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: young man was sexually assaulted in the room