Home संगमनेर संगमनेर: पिकअप व छोटा हत्ती या दोन वाहनांवर पोलिसांची कारवाई साडेपाच लाखांचा...

संगमनेर: पिकअप व छोटा हत्ती या दोन वाहनांवर पोलिसांची कारवाई साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Sangamner Crime: १ लाखाची जनावरे व साडेचार लाखाची वाहने असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत चौघांवर गुन्हा.

Crime Filed Police action on two vehicles, a pickup 

संगमनेर: पिकअप व छोटा हत्ती या दोन वाहनांवर शहर पोलिसांनी कारवाई करत कत्तलीसाठी जाणाऱ्या १० गोवंश जनावरांची सुटका केली. १ लाखाची जनावरे व साडेचार लाखाची वाहने असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत चौघांवर गुन्हा दाखल केला.

पिकअप (एमएच १२ केपी कुरेशी १७५८) व छोटा हत्ती (एमएच ४९ एजी ४९९९) या दोन वाहनातून ०० जनावरे कललीसाठी जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली. उपनिरीक्षक जानकू जाणे यांना कारवाईचे करण्यास सांगितले.

पोलिस पथकाने ही दोन वाहने फादरवाडी येथे पकडली. वाहनांची तपासणी केली असता, त्यात २० जनावरे मिळून आली. कारवाई होत असल्याचे पाहून दोघा वाहन चालकांनी तेथून पळ काढला. पोलिस नाईक गजानन सोमनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गणेश दगडू कदम (वय २२, करुले, ता. संगमनेर) व परवेज याकूब भारतनगर, संगमनेर) या वाहन मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर चालक महमद अलीम कुरेशी, सलीम ऊर्फ सोनू कुरेशी (मोगलपुरा, संगमनेर) है फरार झाले. चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Crime Filed Police action on two vehicles, a pickup 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here