Home अकोले अकोले: घराला आग लागून लाखोंचे नुकसान

अकोले: घराला आग लागून लाखोंचे नुकसान

अकोले: घराला आग लागून लाखोंचे नुकसान

अकोले: तालुक्यातील जाचकवाडी येथील एका शेतकर्याच्या घराला काल सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र यात संभधीत शेतकऱ्याचे संसारपयोगी साहित्य, पावर ट्रक्टर, फवारणी यंत्र, दागिने ठीम्बक नळी या वस्तूंसह कोंबड्या आगीत भस्मसात झाल्या. यात सुमारे चार लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जाचकवाडी येथील धोंडीबा गंगाराम महाले यांच्या घरास काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आग लागली. वारा असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. या आगीत संसारपयोगी वस्तू रुपये २५०००, पावर ट्रक्टर २१५०००, दोब फवारणी यंत्र ३००००, ठीम्बक नळ्या व इतर ५००००, कोंबड्या १००००, दागिने ३५०००, घराचे पत्रे १८०००० व इतर अंदाजे एकूण ३८३००० रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कामगार तलाठी संतोष जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यात सुमारे चार लाख रुपयांचे  नुकसान झाले असल्याचा अहवाल महसूल प्रशासनास पाठविण्यात आला आहे.

Website Title: Akole homes in the fire


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here