Home महाराष्ट्र धक्कादायक: विद्यार्थिनीवर अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घुण हत्या- Murder Case

धक्कादायक: विद्यार्थिनीवर अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घुण हत्या- Murder Case

Student abused and murder by stoning

Murder Case | पालघर: पालघर येथील जव्हार येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. १० वीची परीक्षा दिलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार (Sexually abused) करून दगडाने ठेचून निर्घुण हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दहावीचा निकाल लागण्याआधीच विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह आढळून आल्यावर ही घटना समोर आली आहे.

जव्हार तालुक्यातील वडपाडा येथे ही घटना घडली असून मागील काही दिवसांपासून ही विद्यार्थिनी बेपत्ता होती. या तरुणीचा मृतदेह काल जव्हारमधील तांबडपाडा येथे आढळून आला होता. तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर हत्येच्या तपासाला वेग येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

मयत विद्यार्थिनी ही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मोलमजुरी करत तिने दहावीच्या परीक्षेचा अभ्यास केला होता. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात या विद्यार्थीनीला 67 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र, निकाल पाहण्याआधीच तिची निर्घृण हत्या करण्यात आली.

याप्रकरणी भादवि कलम 302 ,  301 , 341, तसेच पोस्को अंतर्गत  जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी  अटक केली आहे. याप्रकरणी जव्हार अधिक तपास करत आहेत.

Web Title: Student abused and murder by stoning

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here