अहमदनगर: कांदा घेऊन जाणारा ट्रक पलटी, दोन जण…
Pathardi | पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात कांदा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात (Accident) चालक व साथीदार जखमी झाला आहे. ट्रकमधील कांदा रस्त्यावर पसरला होता.
कांदा भरून जाणारा चौदाचाकी मालट्रक (सीजी 08 एजे 9828) हा माणिकदौंडीकडून पाथर्डीच्या दिशेने येत होता. माणिकदौंडीच्या धोकादायक वळणावर हा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. यात दोन जण किरकोळ जखमी झाले आहे. अपघातानंतर रस्त्यावर आणि बाजूला सर्वत्र ट्रकमधील कांदा पडला होता. या अपघातात मोठे नुकसान झाले आहे.
Web Title: onion-truck-overturns-accident