Home पुणे Accident | स्कूल बसच्या चाकाखाली सापडून १२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Accident | स्कूल बसच्या चाकाखाली सापडून १२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

A 12-year-old student was found dead under the wheel of a school bus Accident

Pune | पुणे: शाळेच्या बसच्या चाकाखाली सापडून एका १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यामधून समोर आली आहे. हा भीषण अपघात (Accident) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. पुण्यातील वडगाव खुर्द येथे पब्लिक स्कूलची बस वळण घेत असताना १२ वर्षीय मुलगा मागच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.

अर्णव अमोल निकम (रा. -राजयोग सोसायटी, वडगाव खुर्द) असं या मुलाचं नाव आहे.  मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शाळेच्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी राजयोग सोसायटी जवळील पीएमपीएलच्या बस थांब्या स्कूलबस आली होती. बस थांब्यावर अर्णव निकम आणि इतर विद्यार्थी उतरल्यावर  स्कूल बस वळण घेऊ लागली. त्यावेळी चालकाचे लक्ष नसल्याने काही कळण्याच्या आगोदरच बसचे मागील चाक अर्णवच्या अंगावरून गेले. या घटनेत अर्णवचा दुर्दैवी मत्यू झाला. अर्णवच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या पालकांवर मोठा आघात झाला असून त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

याप्रकरणी  बस चालक दत्तात्रय लक्ष्मण परेकर (वय-49,रा. धनकवडी) याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये करत आहेत.

ज्यावेळी अर्णवचा बसच्या चाकाखाली येऊन अपघात झाला, त्यानंतर त्याला लगेच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाच्या वतीनं सांगण्यात आले.

Web Title: A 12-year-old student was found dead under the wheel of a school bus Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here