अहमदनगर ब्रेकिंग: टेम्पो अंगावर घालून जावयाचा खून – Murder
Karjat | Ahmednagar | कर्जत: कर्जत तालुक्यातील कौडाणे येथे स्वत:च्या लहान मुलाला आपल्या सोबत घेवून जाण्याची विनंती करण्यासाठी गेलेल्या जावयाचा खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दत्तात्रय जानू मुळे (वय ३८) हे कौडाणे येथे सासुरवाडीत मुलाला नेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी सासरकडील नातेवाईकांना मुलाला सोबत पाठविण्याची विनंती केली. यावेळी रवींद्र बाबासाहेब सुद्रिक, बाबासाहेब दत्तात्रय सुद्रिक, नरेंद्र सदाशिव सुद्रिक, विठ्ठल सदाशिव सुद्रिक, अमोल बाबासाहेब सुद्रिक, सदाशिव दत्तात्रय सुद्रिक (सर्व रा. मुळेवाडी ता.कर्जत) यातील दोघांनी मुळे यांना संगनमत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जमिनीवर आपटले. तसेच दत्तात्रय मुळे यांच्या अंगावर टेम्पो घालण्यासाठी चिथावणी दिली. टेम्पो चालकाने टायर अंगावरुन नेवून डोक्यात व छातीस गंभीर दुखापत करून दत्तात्रय यास जिवे मारले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सुनिल जानू मुळे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Murder to be put on the tempo