ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानाच्या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू- Accident News
नेवासा | Newasa: नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना डिस्टिलरी विभागातील संभाजी पांडुरंग सुंबे (वय 42) रा. शहापूर ता.नेवासा या कामगाराचा विजेचा धक्का बसून अपघाती (Accident) मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना डिस्टिलरी विभागातील कार्यरत असलेला कर्मचारी संभाजी सुंबे हा मंगळवार दि.24 मे रोजी डिस्टिलरीमध्ये कामावर असताना पहाटे 4:30 वाजता पंप चालू करण्यासाठी गेला असता विजेचा धक्का लागून झालेल्या अपघातात त्याचा अपघाती मृत्यू झाला. नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शहापूर (ता. नेवासा) या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: Accident News Factory worker dies of electric shock