Home संगमनेर संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात-...

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात- Accident

Accident due to reversal of tempo carrying corn on Pune-Nashik highway

Sangamner | संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात (Accident) घडला. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. टेम्पो रस्त्यावर पलटी झाल्याने कणसे भरलेली पोती महामार्गावर पडल्याचे आढळून आले आहे. स्थानिक प्रशासन अपघातस्थळी दाखल झाले होते. महामार्गावरील टेम्पो हटविण्याचे काम सुरु होते.

शेतीमाल घेऊन निघालेला आयशर टेम्पो चालक बाबासाहेब तातेराव बोडके आणि अर्जुन युवराज गव्हाणे हे कन्नड येथून मक्याच्या कणसाच्या गोण्या संगमनेर मार्गे चाकणला जात होते. टेम्पो शुक्रवारी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास माहुली आला असता नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला. टेम्पोमधील गोण्या महामार्गावर पडल्या. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत.

Web Title: Accident due to reversal of tempo carrying corn on Pune-Nashik highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here