धक्कादायक: पुष्पा मूवी दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
पिंपरी: पुष्पा मूवी दाखविण्याचा बहाणा करून बिल्डींगमध्ये नेत चिल्लर देऊन अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Unnatural sexual abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अजितकुमार राजू पासवान वय ३० रा. हिंजवडी याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. (Pune Rape Case)
याबाबत पिडीत अल्पवयीन मुलाच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. फिर्यादी महिला तिच्या पिडीत अल्पवयीन मुलाला घेऊन कामाला आली होती. त्यावेळी आरोपी पासवान पिडीत मुलाजवळ आला. तुला पुष्पा पिक्चर दाखवितो. असे म्हणून तो मुलाला बिल्डींगमध्ये घेऊन गेला. तेथे चिल्लर पैसे दिले आणि त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला असे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहे.
Web Title: Sexual abuse of a minor under the pretext of showing Pushpa movie