Fire | जिल्हा न्यायालयाच्या आवारात तरुणाने घेतले पेटून
अहमदनगर|Ahmedagar: राहुरी तालुक्यातील एका तरूणाने जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतः ला पेटून (Fire) घेतल्याची घटना आज बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
ऋषिकेश विठ्ठल डव्हाण (रा. बाभुळगाव ता. राहुरी) असे या तरूणाचे नाव आहे. त्याने स्वतःला का पेटून का घेतले याची माहिती अद्याप समोर आली नसून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज सकाळी जिल्हा न्यायालयाचे दैनिक कामकाज सुरू झाले होते. सकाळी ११ वाजता ऋषिकेश हा जिल्हा न्यायालयात आला होता. त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटून घेतले. यामुळे न्यायालय आवारात एकच धावपळ उडाली. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे त्याचे म्हणणे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भिंगार कॅम्प, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Web Title: youth was taken to the district court premises by fire