Home पुणे आनंदाची बातमी!  मान्सून अंदमानात दाखल, उकाडा होणार कमी- Monsoon

आनंदाची बातमी!  मान्सून अंदमानात दाखल, उकाडा होणार कमी- Monsoon

Monsoon enters the Andamans

नवी दिल्ली | Monsoon News: अंदमान बेटात मान्सून दाखल झाला आहे. सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या १ जूनपर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. यंदाच्या वर्षी एक आठवडा लवकर पावसाला (Rain) सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. १ जूनपर्यंत केरळमध्ये आणि केरळच्या आसपासच्या काही भागात पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या १ जूनला पावसाची (Rain) शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातही पुढील 5 दिवस द. कोकण, द. मध्य महाराष्ट्र आणि द. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गडगडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या देशाच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त झाले आहे.  अशात येणाऱ्या मान्सूनमुळे तापमानातही घट होईल.

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Web Title: Monsoon enters the Andamans

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here