धककादायक: पाच महिन्यापासून सातवीत शिकणाऱ्या मुलीचे तीन तरुणांनी केले लैंगिक शोषण – Gang Rape
जळगाव | Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या पाच महिन्यापासून इयत्ता सातवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचं गावातील तीन तरुणांनी लैंगिक शोषण (Gang rape) केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील तीन आरोपींसह त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीची गावातील एका तरुणासोबत ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत या तरुणाने मुलीला गावाबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार (Sexual abuse) केला. या घटनेनंतरही आरोपीने तिच्यावर अत्याचार करणं सुरूच ठेवलं. या घटनेबाबत आरोपी तरुणाने इतर दोन मित्रांना सुद्धा या प्रकारची माहिती दिली. तरुणाने त्याच्या मित्रांना माहिती दिल्यानंतर ते तरुणही त्याच्यावर नजर ठेऊन होते.
या दोघा तरुणांनी आपण गावात सर्वाना याबद्दल सांगू अशी धमकी देत या मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या पाच महिन्यांपासून हे तिघेही तरुण या मुलीवर वारंवार अत्याचार करत होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता मुलगी घराच्या बाहेरून अचानक गायब झाली आणि रात्री उशिरा घरी परतल्यानंतर आईवडिलांनी मुलीला विश्वासात घेत विचारले असता, हा सर्व प्रकार समोर आला. गेल्या काही दिवसात या तिन्ही तरुणानी आपल्यावर लैंगिक अत्याचार केला. हा त्रास असह्य व वेदनादायी झाल्याने मुलीने घडला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला.
या प्रसंगानंतर आई वडिलांनी आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेशवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेत पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीवर अत्याचार करणाऱ्या तीन तरुणांना आणि त्यांना मदत करणाऱ्या अन्य चार जणांनापोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो, अॅट्रो सिटी आणि बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Gang Rape Three young men sexually abused a seventh grader for five months