Home महाराष्ट्र संतापजनक: विवाहितेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार, बनविला व्हिडियो

संतापजनक: विवाहितेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार, बनविला व्हिडियो

Sexual Assault on a married woman in fear of a knife

मुंबई | Mumbai Crime: धारावी परिसरात घरात एकटी असलेल्या १९ वर्षीय विवाहितेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार (Sexual Assault)  केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

विवाहित महिला पोटमाळ्यावर दुपारी झोपलेली असताना तिचे सासरे दरवाजाला कडी न लावताच घरातून बाहेर पडले असता त्यानंतर दुपारी ४ :३० च्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्तींनी घरात शिरून दोघांनीही पोट माळ्यावर झोपलेल्या विवाहितेला चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला आहे. दोन्ही आरोपींमधील एका आरोपीने विवाहितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरा व्यक्ती मोबाइलवर व्हिडिओ बनवत असल्याचे विवाहितेने सांगितले. ओळख लपवण्यासाठी दोघांनीही तोंडाला रुमाल बांधला असल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 376,376 (डी),425, 354,(ए) 354(बी), 354(डी), 506(2), भादवि सह कलम 67,67 (अ),66(इ ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

Web Title: Sexual Assault on a married woman in fear of a knife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here