Home पुणे प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण, प्रियकराला अटक

प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण, प्रियकराला अटक

Lover abducted Boy in lodge

पुणे | Pune: पुण्यात प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण (abducted) करणाऱ्या प्रियकर आरोपीस सहकारनगर पोलिसांनी लातूरमधून ताब्यात घेतले आहे. त्याच्या तावडीतून दीड वर्षांच्या मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली. सुनील सोपान पांढरे (वय २६, रा. पांढरेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत एका २७ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  महिला आणि पांढरे एकाच कंपनीत काम करीत असल्याने त्यांची ओळख झाली होती. दोघे जण पुणे-सातारा रस्त्यावरील एका लॉजमध्ये मुक्कामास होते. महिलेबरोबर तिचा दीड वर्षाचा मुलगाही होता. पांढरे आणि महिलेत भांडण झाले तेव्हा पांढरेने महिलेला स्वच्छतागृहात कोंडले आणि तिच्या मुलाला घेऊन तो फरार झाला. महिलेने आरडाओरडा केल्याने लॉजच्या व्यवस्थापकाने तिची सुटका केली.

या घटनेनंतर पीडित महिलेने तातडीने सहकारनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.  पोलिसांनी तातडीने पांढरेचा शोध सुरू केला. तेव्हा तो एका बसमधून लातूरकडे गेला असल्याची माहिती तपासात मिळाली. पोलिसांनी बसचा पाठलाग सुरू करून त्याला लातूर येथील एका लॉजमधून पहाटे अटक करण्यात आली आहे. त्याच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.

Web Title: Lover abducted Boy in lodge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here