Molestation: तरुणीचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल
Ahmednagar | अहमदनगर: दुचाकीवर आलेल्या तरूणाने तरुणीचा हात धरून विनयभंग (Molestation) केला असल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी पीडित तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा ( molestation) दाखल करण्यात आला आहे. शोएब शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पंचपीर चावडी, माळीवाडा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
फिर्यादी तरुणी शेख याला ओळखते. 1 एप्रिल, 2022 रोजी सायंकाळी फिर्यादी युवती चौपटी कारंजा येथून पायी जात असताना शोएब शेख तेथे आला व युवतीला म्हणाला,‘चल गाडीवर बस’, तेव्हा युवतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. युवती पुढे जाऊन रिक्षात बसली, तेव्हा शोएबने युवतीचा हात धरून गैरवर्तन करत विनयभंग (molestation) केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून शोएब शेख याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Young man molestation, young man charged