अहमदनगर जिल्ह्यात या भागात राज्यातील पहिला काचेचा पुल बनणार
Ahmedngar | Akole | अहमदनगर: काचेच्या पुलाचे विदेशातले अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिले असतील. अनेकांचं तिथे जाण्याचं स्वप्न देखील असेल तर आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण काचेचा पूल (glass bridge) आता चक्क अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तयार होणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका हे एक मोठे पर्यटन स्थळ मानले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काचेचा हा पूल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे
महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल रंधा धबधबा येथे होणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपये अर्थ संकल्पात मंजूर झाले आहेत. त्यापैकी अडीच कोटीचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतात सहा ठिकाणी काचेचे पूल आहेत. मात्र महाराष्ट्रात काचेचा पूल नाही. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल तयार करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने राज्याच्या अर्थसंकल्पातून 5 कोटी रूपये मंजूर करून आणला आहे.
याबाबत बोलताना आमदार लहामटे (MLA Kiran Lahamte) पुढे म्हणाले की, अकोले तालुक्यातील पर्यटन विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अकोले तालुक्यात रंधा धबधबा येथे लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटी पैकी 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झालेला आहे.
आजपर्यंत अकोले तालुक्यात भरपूर निधी आणला असून यापुढे ही तो आणला जाईल, असेही त्यांनी सांगितले. रंधा धबधबा येथे होणारा काचेचा पूल हा महाराष्टातील पहिला पूल असून देशातील 6 वा पूल आहे.
Web Title: first glass bridge in the state in Ahmednagar