कळस: अपूर्ण काम पूर्ण झालेचे दाखला देणारा अभियंता व ग्रामसेवक यांचेवर कारवाईची मागणी
कळस बु: ता अकोले येथील चौदाव्या वित्त आयोग निधीतून सुलतानपूर शाळेचे संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण असताना पूर्ण केलेचा दाखला देणारा व त्याचे बिल अदा करणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे व रिपाई चे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केली आहे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे आपले सरकार पोर्टल द्वारे केलेले तक्रारीत म्हटले आहे की, कळस बु ता अकोले येथे चौदाव्या वित्त आयोग निधीतून सुलतानपूर जिप शाळेचे संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले हे काम अपूर्ण आहे भिंतीच्या मागील बाजूस प्लँस्टर अपूर्ण आहे. या भिंतीचे मागील बाजूचे शेतकरी यांनी हे प्लँस्टर होण्याची वाट पाहिली मात्र काम अपूर्ण असताना पूर्ण केलेचा दाखला दिला व त्याला बिल अदा झालेचे कळले मुळे व त्याला कांदा लागवड करायची असले मुळे त्याने जमिनीचे सपाटीकरण केले त्यामुळं निम्मी भिंत मातीच्या खाली गाडली गेली व निम्मी भिंत तशीच बिगर प्लँस्टर ची आहे. या भिंतीला प्लँस्टर न केलेमुळे मागील शेतातील पाणी या भिंतीत जाऊन ही भिंत टिकणार नाही या शाळेला जमीन दान करणारे शेतकरी असताना मात्र प्रशासकीय अधिकारी कामात हलगर्जीपणा करीत आहेत. तसेच गावच्या सरपंच पदी महिला असलेने त्यांचेही दिशाभूल करून गैरफायदा घेतला असावा. तसेच त्याठिकाणी कामाचा फलक लावला आहे त्यावर काम किती तारखेला सुरू झाले ते कधी पूर्ण झाले याचाही उल्लेख नाही.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा