अकोले तालुक्यात घाटात स्कॉर्पियो गाडी अडीचसे फुट खोल दरीत कोसळून दोन ठार
Ahmednagar | अकोले | Akole: अकोले तालुक्यातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील बदगी बेलापूर खामुंडी घाटात स्कॉर्पियो गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात (Accident) बदगी येथील दोन युवक ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.
तालुक्यातील जांभळे येथील कांदा व्यापारी नवनाथ पोपट हुलवळे वय ३७ व राहुल खंडू हुलवळे वय ३२ हे दोघे ओतूर येथून काम आटोपून खामुंडी घाटमार्गे बदगीकडे रात्री उशिरा परतत असताना घाटात गाडी चालकाचे नियंत्रण सुटून गाडी अडीचशे फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात नवनाथ हुलवळे रा. जांभळे ता. अकोले हे जागीच ठार झाले तर राहुल हुलवळे यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडी डोंगरावर असणाऱ्या खोल दरीत कोसळून चक्काचूर झाली. दरीतील एका कठड्याला लोंबकळत असलेल्या अवस्थेत अडकल्याने दोघानाही काढण्यात मोठी कसरत करावी लागली.
अपघाताची माहिती समजताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Akole Accident Two killed as Scorpio crashes into gorge