नौदलात नोकरीचे आमिष दाखवून तरुणास दीड लाखाला गंडा
Ahmednagar | अहमदनगर: भारतीय नौदलात नोकरीचे आमिष दाखवून तरूणाकडून दीड लाख रूपये उकळल्याची (Fraud) घटना समोर आली आहे. भरतीचे खोटे नियुक्त पत्र देत फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी अंकुश भाऊसाहेब टकले (वय 32 रा. भोयरे पठार ता. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीवरून गणेश बाबासाहेब घुगे (रा. कल्याण पश्चिम, मुंबई) याच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. त्याला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने 12 मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंकुश टकले व गणेश घुगे यांची मुंबईमध्ये ओळख झाली होती. मी भारतीय नौदलात नोकरीला असल्याचे घुगे याने टकले यांना सांगितले होते. टकले यांनी घुगे यांच्याकडे नेव्ही भरतीसाठी विचारणा केली.
तेव्हा घुगे म्हणाला, ‘माझी नेव्हीमध्ये खूप ओळख आहे. भरतीसाठी साडेपाच लाख रूपये द्यावे लागतील. सुरूवातीला दोन लाख व नियुक्ती झाल्यानंतर बाकीचे पैसे द्यावे लागतील, असे सांगितले.
त्यानुसार टकले यांनी 13 फेब्रुवारी 2021 रोजी एक लाख आणि 15 फेब्रुवारी 2021 रोजी 50 हजार रूपये घुगे याला फोन-पे केले. 29 ऑक्टोबर 2021 रोजी टकले यांच्या मेलवर नियुक्त होऊन हजर होण्यासंदर्भात एक पत्र आले होते. 2 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौदलात आय. एन. एस. चिल्का, ओरीसा येथे हजर होण्याबाबत त्यामध्ये नमूद केले होते. टकले यांनी याबाबत नेव्हीच्या मुंबई येथील कार्यालयात या नियुक्त पत्राबाबत खात्री केली असता सदरचे नियुक्ती पत्र खोटे असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे टकले यांच्या लक्षात आल्याने त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Web Title: Fraud to a young man by showing the lure of a job in the Navy