Home अहमदनगर अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करणार्‍या दोघा रोडरोमियोंवर विनयभंगाचा गुन्हा

अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करणार्‍या दोघा रोडरोमियोंवर विनयभंगाचा गुन्हा

Ahmednagar Crime of molestation on two roadrunners chasing a minor girl

Ahmednagar Crime | Karjat | कर्जत: काही दिवसांपासून अश्लील वर्तन करून एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करत त्रास देणाऱ्या दोन रोडरोमियोंवर विनयभंगाचे (molestation) गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

ईश्वर जयराम हुलगुंडे (रा. खंडाळा ता.कर्जत) व विजय हुलगुंडे (रा. गोयकरवाडी ता. कर्जत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

वरील दोघे जण गेली काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून तिला त्रास देत होते. त्यांनी त्या मुलीला कर्जत बसस्थानक येथे त्रास दिल्यानंतर तिने फोनवरून भावाला फोन करून हकीकत सांगितले आणि बोलावून घेतले. यावेळी दोघांनीही तेथून पळ काढला. ही माहिती कर्जत पोलीस ठाण्यात समजताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे तात्काळ पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, शाम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, अमित बर्डे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.

कर्जत पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या भावाने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघांवर विनयभंग तसेच (पोस्को) बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्हीही संशयितांना काही तासांत अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रोडरोमियोंना चांगलीच चपराक बसणार आहे.

Web Title: Ahmednagar Crime of molestation on two roadrunners chasing a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here