Home Accident News भीषण अपघात: कार चारशे फुटांवर जाऊन आदळली, डॉक्टर ठार

भीषण अपघात: कार चारशे फुटांवर जाऊन आदळली, डॉक्टर ठार

Horrible accident Car crashes into 400 feet, doctor killed

सांगली: भरधाव वेगाने जाणारी कार पलटी होऊन झालेल्या अपघातात (Accident) डॉ. अरूण राजाराम मोराळे (वय ६६, रा. एसएससी बोर्ड, रिंग रोड, मनिषानगर, कोल्हापूर) हे जागीच ठार झाल्याची घटना रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ घडली. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की,  डॉ. मोराळे हे आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात (१०८ रूग्णवाहिका) झोनल मॅनेजर होते. ते शुक्रवारी सकाळी कार (क्र.एम.एच.०९ डी.एक्स.४६४४) ने कोल्हापूरहून लातूरला मिटिंगला जाण्यासाठी निघाले होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर विठ्ठलवाडीजवळ भरधाव निघालेली कार दोन्ही रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ढिगाऱ्यावरून दोनदा पलटी होऊन सुमारे चारशे फुटांवर रस्त्याच्या उजव्या बाजूला विरूद्ध दिशेला तोंड करून उभारली. कारमध्ये मागच्या बाजूला बसलेल्या डॉ. मोराळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची कवटी फुटली. यामध्ये ते जागीच ठार झाले तर कारचा चालक सोहेल सलीम शेख (वय २९, रा. कोल्हापूर) हा जखमी झाला आहे.

Web Title: Horrible accident Car crashes into 400 feet, doctor killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here