अहमदनगर: ऊसतोड कामगाराच्या बालकाला बोलेरो गाडीने चिरडल्याने मृत्यू
लोणी | Rahata Accident | Loni: राहता तालुक्यात ऊस तोड कामगाराच्या मुलाला बोलेरो गाडीने चिरडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रवरानगर-पाथरे रस्त्यावर ऊसतोड कामगाराचा अडीच वर्षाचा मुलगा रस्त्याच्या कडेला खेळत असताना भरधाव बोलेरोने त्याला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. सार्थक सागर जगताप असे या मयत मुलाचे नाव आहे.
विखे कारखान्याकडे ऊसतोड कामगार म्हणून काम करणारे सागर संभाजी जगताप रा.कानडगाव ता.राहुरी यांचा अडीच वर्षांचा मुलगा सार्थक मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रवरानगर जवळच पाथरे रोडवरील भंडारी वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला खेळत असताना भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो एम एच 17बी वाय 0304 च्या चालकाने सार्थकला जोराची धडक दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वाचा: Ahmednagar News
अपघातानंतर बोलेरो चालक पसार झाला आहे. याप्रकरणी सागर जगताप यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी बोलेरो व चालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Web Title: Rahata Accident Bolero car crushes child to death