Home अहमदनगर नगरमध्ये २७ जणांवर गुन्हे दाखल हे आहे कारण

नगरमध्ये २७ जणांवर गुन्हे दाखल हे आहे कारण

27 people have been crime charged in the city

Ahmednagar Crime | अहमदनगर: १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त विनापरवाना डीजे लावून मिरवणूक काढल्याप्रकरणी 27 जणांविरूध्द नगर शहर पोलिसांनी कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी ५ साऊंड सिस्टिमही जप्त केल्या आहेत.

करोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी नगर शहरात मिरवणुकीच्या मोठ्या तयारी करण्यात आल्या होत्या शासनाने लागू केलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांकडून शिवजयंती साजरी करणार्‍या मंडळास देण्यात आलेल्या होत्या, मिरवणुकीस परवानगी नाकरण्यात आली होती. पाच मंडळास नोटीसा देण्यात आल्या होत्या. परंतु पोलिसांचा आदेश न जुमानता शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक काढल्यानंतर कोतवाली व तोफखाना पोलिसांनी या मिरवणुका मध्येच बंद करून साऊंड सिस्टिम जप्त केली.

कोतवाली पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी चार फिर्याद दिल्या आहेत. त्यानुसार 23 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ओमकार रमेश घोलप, ऋषिकेश दत्तात्रय कावरे, रोहित रमेश सोनेकर, शुभम नागेश कोनाकुळ, महेश बाळासाहेब चिंतामणी, कपील दिगंबर ढोकणे, संकेत सुर्यकांत जाधव, राहुल श्रीपाद कातोरे, सोनू दीपक पवार, अक्षय सुरेश शिंदे, उमेश राजू काटे, शुभम दिलीप राहींज, आदेश राजेंद्र झेंडे, ऋषभ किशोर शिंदे, नितीन मुकुंद सुरसे, विशाल मच्छिंद्र शिरवळे, विकास रमेश अकोलकर, मयुर श्याम साठे, शुभम ज्ञानदेव सुडके, राकेश ठोकळ, अमोल दत्तात्रय गोरे, गणेश भुजबळ, रेवनाथ पांडुरंग पोळे यांचा समावेश आहे.

वाचा: Ahmednagar News

तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस नाईक तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश अरूण कराळे, ओम महेश दोन्ता, करण विजय तनपुरे (सर्व रा. श्रीराम चौक, सावेडी, नगर), सुनील भाऊसाहेब गहिरे (रा. बोल्हेगाव, नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 27 people have been crime charged in the city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here