संगमनेर: शिवसेना माजी तालुका प्रमुख कैलास वाकचौरे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
संगमनेर: शिवसेना माजी तालुका प्रमुख कैलास वाकचौरे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
संगमनेर: शिवसेनेचे माजी संगमनेर तालुका प्रमुख व माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी सातत्याने पक्ष विरोधी भूमिका घेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात सोशल मिडीयावर टीका केल्याने व आपल्या जुन्या लेटरपडचा गैरवापर केल्याने त्यांची शिवसेना पक्षातून कायमची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिली.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
कैलास वाकचौरे हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम पहिले होते. तसेच पाच वर्ष शिवसेनेचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेत पक्षाच्या स्थानिक तसेच वरिष्ठ नेत्यांविरोधात सोशल मेडीयावर टीका करत आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे सध्या त्यांच्याकडे पक्षाचे कोणतेही अधिकृत पद नसताना त्यांनी आपल्या जुन्या लेटरपडचा दुरुपयोग करून महावितरण कंपनी व त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांशी पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे पक्षाने याची गंभीर दाखल घेत त्यांच्या विरोधी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मागील नगरपालिका निवडणुकीत त्यांनी पक्ष विरोधी भूमिका घेत त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेत राहूनही पक्ष विरोधी भूमिका घेणे, स्थानिक व वरिष्ठ नेत्यांविरोधी टीका टिप्पणी करणे, पक्षाला नुकसान होईल असे बदनामी करणे, जुन्या लेटरपड चा गैरवापर करणे अशा विविध कारणामुळे पक्षाने त्यांच्या विरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला. शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे तसेच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या आदेशाने कैलास वाकचौरे यांची पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी प्रसिद्धी पत्रकादवारे दिली असून या पत्रकावर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व शहर प्रमुख अमर कतारी यांच्या सह्या आहेत. वाकचौरे यांच्या हकालपट्टीने संगमनेर शहर शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
Website Title: Shiv Sena’s former Taluka chief Kailas Wakchaure’s ouster from Shivsena
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: