राहत्या घरात अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
अहमदनगर | Ahmednagar: राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची घटना सावेडी उपनगरातील भगवान बाबा चौकात घडली.
सोनल अदिनाथ शिरसाठ (वय 17) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्रीच्या वेळी घरामध्ये सोनलचे आई-वडिल, भाऊ आदी कुटूंबातील व्यक्ती घरात होते. रात्रीच्या सुमारास सोनलने राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. सकाळी लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आल्याने बुधवारी सकाळी पोलिसांना माहिती दिली. याबाबतची माहिती बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तोफखाना पोलिसांना मिळाली. सोनल हिने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप अस्पस्ष्ट आहे.
सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर, पोलीस नाईक संभाजी बडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मृत सोनल हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रूग्णालयात करण्यात आले आहे.
पोलिसांनी अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास तपास पोलीस नाईक बडे करीत आहेत.
Web Title: Suicide by hanging of a minor girl in the living room