Crime: भाजीचे दुकान लावण्यावरून वाद, भाऊ बहिणीस मारहाण
Ahmednagar Crime | अहमदनगर: भाजी दुकान लावण्याच्या वादातून बहिण-भावाला सत्तुर, दगड, लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना भिंगारमधील संभाजीनगर परिसरात घडली.
शरद बन्सी पाथरे (वय 43) व त्यांची बहिण सुनीता नितीन पाटोळे (वय 40 रा. माधवबाग, भिंगार) या मारहाणीत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत जखमी शरद पाथरे यांनी भिंगार पोलिसांना रूग्णालयात जबाब दिला आहे. त्यानुसार बन्सी साधू पाथरे, सचिन बन्सी पाथरे, संदीप बन्सी पाथरे, मिरा सचिन पाथरे, जेसंता संदीप पाथरे, माया ऊर्फ साकाबाई बन्सी पाथरे (सर्व रा. माधवबाग, भिंगार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शरद पाथरे यांच्या संभाजीनगर येथील मालकीच्या गाळ्यासमोर आरोपी जमले. त्यांनी दुकानासमोर भाजी दुकान लावण्याचे कारणावरून फिर्यादीसोबत भांडण करण्यास सुरूवात केली. तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाले, ही जागा माझी आहे. याचा राग येवुन बन्सी पाथरे याने त्याच्याकडील सत्तुरने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. तसेच इतर आरोपींनी फिर्यादी व त्यांची बहिण सुनीता पाटोळे यांना दगड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक आर. आर. द्वारके करीत आहेत.
Web Title: Ahmednagar Crime Dispute over setting up of vegetable shop