Home अकोले अकोले तालुक्यात सोळा एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

अकोले तालुक्यात सोळा एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

Sixteen acres of sugarcane in Akole taluka

Akole: अकोले: अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी रोडवर दातीर चौक परिसरात दुपारी एक वाजेच्या सुमारास सोळा एकर ऊस आगीच्या (Fire) भक्ष्यस्थानी सापडल्याची घटना घडली आहे. ही आग वीजवाहक तारांमुळे लागली असल्याचे बोलले जात आहे.

दातीर चौक येथे मोठ्या बाबा मंदिराच्या मागील बाजूस वीजवाहक तारांना घोळ पडलेला आहे. अनेक वेळा वीज वितरण कंपनीला सुचना करूनही सदरचे काम होत नसल्याने नुकसान ग्रस्त शेतकरी वीज वितरण कंपनीच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेत आहे.

वीज वाहक तारांच्या स्पार्किंगमुळे तोडणीला आलेल्या उसाला आग लागली. अकोले व संगमनेर कारखानाच्या अग्निशमन घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अगस्तीचे कार्यकारी संचालक अजित देशमुख, क्रेन व्यवस्थापक सयाजी पोखरकर, रावसाहेब वाकचौरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. या आगीत अगस्तीचे संचालक सुनील दातीर, बबन दातीर, सुरेश दातीर, अमोल दातीर, संजय दातीर, मोहन दातीर, अंबादास दातीर, अंबादास मोहन दातीर यांच्या क्षेत्रातील उसाचे नुकसान झाले आहे. या घटनेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Sixteen acres of sugarcane in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here