Home अकोले अकोले नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी या नेत्यांचे अर्ज दाखल

अकोले नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी या नेत्यांचे अर्ज दाखल

Akole Nagar Panchayat Mayor

Akole Nagar Panchayat Election | अकोले: अकोले नगर पंचायत निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपचे १२ सदस्य हे विजयी झाले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष हे भाजप गटातुनच होणार हे स्पष्ट होते. अकोले नगरपंचायतचे अध्यक्षपद सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुले झालेले आहे. नगराध्यक्ष पद निवडण्यासाठी आज ९ फेबृवारी रोजी फॉर्म भरण्याची मुदत आहे.

यापदासाठी यापूर्वीच माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे आणि भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांच्या नावाची चर्चा होती. हे दोन्हीही नगरसेवक दोनदा निवडून आलेले आहेत.

याबाबत प्रारंभी भाजप पक्ष कार्यालयात माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड, पक्ष निरीक्षक व भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन ऍड.दिनकर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराम डेरे यांनी पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या सदस्यांची मते जाणून घेऊन तसेच पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली.

त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी सोनालीताई नाईकवाडी यांची उमेदवारी जाहीर केली. त्याप्रमाणे सौ.नाईकवाडी यांनी अकोले नगरपंचायतमध्ये जाऊन मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बाळासाहेब वडजे हे सूचक व हितेश कुंभार हे अनुमोदक आहेत.

Web Title: Application of these leaders for the post of Akole Nagar Panchayat Mayor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here