Sangamner Accident: पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंबीफाटा येथे भीषण अपघातात एक जण जागीच ठार
Sangamner Accident | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागात आंबी फाटा येथे दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जगन्नाथ मुसळे हे टेंपो क्रमांक एम एच १४ जे एल ९०९७ हा घेऊन संगमनेरहुन नारायण गांव येथे कंपनीचा माल खाली करण्यासाठी चालले होते ते मंगळवारी सायंकाळी आंबीखालसा फाट्यावर ते आले असता दुचाकी क्रमांक एम एच १५ एडी ७८१० यावरून भुरा गंगाराम माळी वय ५५ राहणार देवळाने तालुका सटाना जिल्हा नाशिक हेही पाठीमागुन आले व उंच असणाऱ्या गतीरोधकावर जाऊन आदळल्याने खाली पडले यावेळी त्यात टेंपोचे चाक अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. त्यानंतर त्यांना खाजगी रूग्णवाहीकेद्वारे संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, नारायण ढोकरे, सुनिल साळवे, नंदकुमार बर्डे, मनेश शिंदे, अरविंद गीरी यांसह घारगांव पोलीस ठाण्याचे किशोर लाड नामदेव बीरे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली.
Web Title: One person was killed on the spot in a tragic accident at Sangamner