Home संगमनेर संगमनेर: शेतीच्या वादातून महिलेस मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

संगमनेर: शेतीच्या वादातून महिलेस मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

संगमनेर: शेतीच्या वादातून महिलेस मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

आश्वी: संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे शेतीच्या वादातून उभ्या असलेल्या मकास पाणी भरू नको म्हणत दादागिरी करत महिलेस विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न झाला. विजेच्या कट आउट ने मारत महिलेस जखमी केले.तर आरोपीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

हिराबाई नंदू जोरी वय ५० यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, आपल्या शेतातील मकाला पाणी भरत असताना आरोपी चंद्रकांत बबन जोरी, गणेश चंद्रकांत जोरी अक्षय चंद्रकांत जोरी या तिघांनी तिथे येऊन चालू असलेली विहिरीवरील विजेची मोटार बंद केली. पाणी बंद झाल्याने हिराबाई जोरी या विहिरीजवळ जाऊन आरोपीस मोटार बंद का केली असा जाब विचारला, याचा राग येऊन आरोपीने हिराबाई जोरी यांना विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या सावध गतीत असल्याने झाडाच्या साह्याने त्यांनी आपला बचाव केला. चंद्रकांत जोरी यांनी विजेच्या कट आउट ने हिराबाई च्या चेह्र्यासह इतरत्र जोरदार पप्रहार करून जखमी केले. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने महिला व तिच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. दहशतीचे वातावरण त्यांच्या भोवती निर्माण करण्यात आल्याचे सदर महिलेने सांगितले. आश्वी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविला आहे. घटनेचा पुढील तपास आश्वी पोलीस करत आहे.

Website Title: sangamner News Feminist woman suffers from farming dispute


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here