सरकारचे निर्बंध म्हणजे शाळा बंद, बार चालू: आ. राधाकृष्ण विखे पाटील
Ahmednagar | राहाता: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विविध निर्बंध लादले आहेत. सरकारचे निर्बंध म्हणजे शाळा बंद, बार चालू असेच असल्याने सरकारची नेमकी दिशा कोणती असा सवाल आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील इतर जनतेचाही विचार करावा, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.
कोरोना उपचारानंतर घरी दाखल झाले आहेत. त्यांनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. सरकारने लागू केलेल्या निर्बंधावर त्यांनी टीका केली आहे. कोविड संकट काळात सरकारची कोणतीची निर्णय क्षमता दिसून आली नाही. मागील वेळेसही सरकारने मंदिर बंद ठेवून मदिरालयं सुरु ठेवली होती, सध्या देखील तीच परिस्थिती दिसून येत आहे.
१५ फेब्रुवारी पर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र दुसरीकडे परमिट रुम सुरु ठेवण्यावर सरकारचे कोणतेही बंधनं नाहीत यावरुनच या सरकारची दिशा कोणती आहे हे समजते. महाविद्यालये बंद करुन, सरकारने आता विद्यार्थी, पालकांच्या जीवनाशी खेळ करू नये सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोधच आहे. त्यामुळे टास्कफोर्सने सुचविलेल्या सुचनांचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली.
Web Title: Ahmednagar Government restrictions mean schools are closed, bars are open