वीज सुरळीत करीत असताना वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
Ahmednagar News Live | Rahata Accident | राहता: राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील वायरमनचा बाभळेश्वर येथे विजेचा शॉक बसल्याने दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. सुभाष काशिनाथ निर्मळ (वय.५४) असे या मृत वायरमनचे नाव आहे.
शनिवारी रात्री बिघाड झाल्याने पिंपरी निर्मळ येथील वाडी वस्तीवरील विज पुरवठा खंडीत होता. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी विज वितरणकडे आऊट सोर्समध्ये कार्यरत असलेले सुभाष काशिनाथ निर्मळ रविवारी सकाळी बाभळेश्वर येथे पोलवर चढले असता त्यांना विजेचा शॉक बसल्याने निर्मळ यांना प्रवरा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले आहे. सदैव कार्यतत्पर व मनमिळाऊ असलेल्या सुभाष निर्मळ यांच्या दुदैवी निधनामुळे ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Rahata Accident Wireman dies of electric shock