चिंतेत वाढ: राज्यात कोरोनाचा उद्रेक, निर्बंधाबाबत उद्या निर्णय: राजेश टोपे
मुंबई | Corona News : राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढतोय. राज्यातील बाधितांचा आकडा हा दुपटीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. या वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांचा आकडा हा 5 हजारच्या वरती गेला आहे. तर मुंबईच्या आकडेवारीत लक्षणीच वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 368 नवे रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक म्हणजे मुंबईतला आकडा हा 3 हजारच्या पार गेला आहे. मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 671 नवे रूग्ण आढळून आले आहेत.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत वाढत्या रुग्णसंख्येला प्रतिबंध घालण्यासाठी काय उपाय करावे लागतील, यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राज्यात आणखी कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याचं म्हंटलं जात आहे. त्याबाबत मुख्यमंत्री आज किंवा उद्या निर्णय घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
Web Title: Corona outbreak in the Maharashtra